
जम्मू कश्मीरमध्ये आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यात एक लश्करचा टॉपचा कमांडर असल्याचे समोर आले आहे.
जम्मू कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात काही दहशतवादी लपल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा सैन्य आणि पोलिसांनी इथे शोधमोहीम राबवली. तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. उत्तरादखल सुरक्षा दलाने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात दोन दशतवादी ठार झाले. त्यात एक लश्कर ए तैयब्बाचा कमांडर इश्फाक डार उर्फ अबुर अकरमचा समावेश आहे.
2 terrorists killed. One of them was LeT commander Ishfaq Ahmed Dar. He was active since 2017. He was a Police Constable earlier & was involved in many killings of Police personnel & civilians. Both were residents of Shopian. Op concluded at 3 am: IGP Kashmir on Shopian encounter pic.twitter.com/VpAQwMg12O
— ANI (@ANI) July 19, 2021
अकरम 2017 पासून कश्मीर खोर्यात दहशतवादी कारवाया करत आहे. मृत दहशतवाद्यांकडून AK- 47 आणि मोठ्या प्रमाणात मॅगजीनस गोळ्या सापडल्या आहेत.


























































