
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमधील श्रीनगर शहरात जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. या चकमकीदरम्यान स्थानिकांनी जवानांवर दगडफेक केली, सुदैवाने या दगडफेकीत एकही जवान जखमी झाला नाही.
जम्मू कश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर शहरातील नौगाम भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्यानंतर १५ राष्ट्रीय रायफल्स व केंद्रीय राखील पोलीस दलाच्या जवानांनी या भागात शोध मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. चकचमकीआधी या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
जम्मू कश्मीरमध्ये 250 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; सुरक्षादल अलर्टवर
चकमक सुरू असताना लोकांनी जवांनांवर दगडफेक केली. आम्ही लोकांना चकमकीच्या ठिकाणी न येण्याचे आवाहन करतोय; मात्र लोकं ऐकत नाहीत, सध्या आमची शोधकारवाई सुरू असून दहशतवाद्यांकडील स्फोटके निकामी करण्याचे काम सुरू असल्याचं मध्य कश्मीरचे पोलीस उपमहानिरिक्षक वी. के. बिरदी यांनी सांगितले.
summary : Two terrorists killed in gunfight at Nowgam
























































