‘ऑपरेशन ऑल आऊट’ सुरू; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,श्रीनगर

शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर  हिंदुस्थानी लष्कराने कश्मीर खोऱयात पुन्हा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ सुरू केले आहे. आज थेट कारवाई करीत बांदीपुरामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

बांदीपुरातील बिजबेहरा येथे दहशतवादी हल्ल्याची खबर मिळताच लष्कराने आज सकाळी ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केले. यावेळी जोरदार चकमक झडली. त्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. रमजानमध्ये शस्त्रसंधीच्या काळात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ थांबविले होते. दहशतवाद्यांनी हल्ला केला तरच त्याला प्रत्युत्तर दिले जात होते.