
आयआयटी कानपूरच्या एका संशोधन पथकाने हरियाणाच्या यमुनानगर जिह्यात जमिनीत खोलवर गाडलेला प्राचीन बौद्ध स्तूप आणि इतर वास्तू अवशेषांचे स्थळ शोधले आहे. ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (जीपीआर) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधकांनी सुमारे 6 ते 7 फूट खोलवर गोलाकार रचना, जुन्या भिंती आणि खोलीसारख्या संरचनांचा शोध घेतला.
























































