भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात 28 जूनला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास खडी मशीन चौकाकडून गोकुळनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. करण हरिदास बरकडे (वय 18) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक गणेश किसन राउत (वय 32, रा. हिरे, माण, सातारा) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. हरिदास बरकडे (वय 50 ) यांनी तक्रार दाखल केली आहे.

खडी मशीन चौकाकडून करण सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गोकुळनगरकड जात होते. त्यावेळी ट्रकचालक गणेशने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्याने करणचा मृत्यू झाला. याप्रकरणी पी.पी. डोईफोडे अधिक तपास करीत आहेत.