सराईत दुचाकी चोराला अटक, मोबाईलसह दुचाकी चोरीचे गुन्हे उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरात वाहनचोरीसह मोबाइलचोरी करणाऱ्या सराईताला समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन वाहनचोरी व मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सुलतान शेख (19,रा.येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

समर्थ पोलीस हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना माहिती मिळाली की, नाना पेठ आझाद आळीमध्ये एकजण मोबाईलची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानूसार पथकाने सापळा रचून सुलतानला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नाना पेठ येथुन मोबाईल चोरल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता त्याने दिड महिन्यापूर्वी गणेश पेठ येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याशिवाय सासवड येथून दुचाकी आणि हॉस्पीटल जवळ एक मोबाईल चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले. सुलतानकडे आणखी तीन मोबाईल मिळून आले आहेत.

ही कामगिरी उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांचे मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतिश भालेराव, पोलीस अंमलदार जितेंद्र पवार, धिरज शिंदे, सुमित खुट्टे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांनी केली.