ओमेक्सच्या बॉयलरचा स्फोट, दोन कामगार ठार

4

सामना प्रतिनिधी । औसा

लातूर औसा रोडवरील कारंजे खडी केंद्राजवळ असलेल्या औसारोडवर बुधोडा शिवारात असलेल्या ओमेक्स फर्टिलायझर्स प्रा. लि. कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होऊन दोघा कामगाराचा मृत्यू झाला.

बुधोडा शिवारात आनेक वर्षापासून ओमेक्स या नावाने कंपनी असून कंपनीमध्ये जूने टायर जाळून तेल काढले जाते. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास या बॉयलरचा स्फोट झाला. यात मेहताब बाबूमियॉ मुल्ला (36) रा. सेलू ता. ओसा आणि उदयचरण ललईराज कोल रा. बहरी मध्य प्रदेश या दोघा कामगारांचा मृत्यू झाला. स्पोटामुळे लागलेली आग विझण्यासाठी लातूर व औसा येथील आग्नीशामक दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या.