
भायखळा पश्चिमेकडे एका इमारतीचे काम सुरू असताना चिखल व मातीच्या ढिगाऱयाखाली सापडल्याने पाच मजूर जखमी झाल्याची घटना घडली. या पाचही जणांना नायर इस्पितळात नेले असता त्यातील दोघांना मृत घोषित केले.भायखळा पश्चिमेकडे हन्स मार्गावर इमारतीचे काम सुरू आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या पाया उभारणीचे काम सुरू असताना ही घटना घडली. डॉक्टरांनी त्यातील राहुल (30) आणि राजू (28) या दोघांना दाखलपूर्व मृत घोषित केले, तर सज्जाद अली (25), सोबत अली (28) आणि लाल मोहम्मद (18) या तिघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.




















































