एक फूल दो माली, लफड्यात एकाचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बंगळुरू

गुजरातमधील एका तरुणाचा बंगळुरूत मृत्यू झाला आहे. रौनक चौधरी असं या तरुणाचं नाव असून तो नर्सिंगचं शिक्षण घेत होता. रौनक हा रॉयल आणि अपूर्व चौधरी यांच्यासोबत  त्रिशाला रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये उतरले होते. बुधवारी त्यांची नर्सिंगची पहिल्या वर्षाची परीक्षा होती. या परीक्षेसाठी रौनकप्रमाणे १३० विद्यार्थी गुजरातहून बंगळुरू इथे आले होते.

ज्या हॉटेलमध्ये रौनक आणि त्याचे मित्र रहात होते,त्याच हॉटेलमध्ये त्यांची मैत्रिण अश्विनीदेखील रहात होती. रौनक आणि त्याच्या रुममधील मित्रांचं अचानक कडाक्याचं भांडण सुरू झालं. अश्विनीने हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती केली. भांडणाच्यावेळी तिला कळालं की हा वाद एकाच मुलीच्या मागे सगळेजण प्रेमात पागल झाल्याने सुरू झाला आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास रौनक रुमबाहेर पडला आणि बाल्कनीमध्ये गेला. रॉयल त्याच्यापाठोपाठ गेला आणि त्याने त्याला धक्का मारला, ज्यामुळे रौनकचा मृत्यू झाला असं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. रॉयलने मात्र आपण धक्का मारला नसून रौनक अपघाताने पडल्याचं म्हटलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी मात्र रॉयलनेच धक्का मारल्याचं म्हटलंय.