
मध्य प्रदेशमध्ये फेसबुक प्रोफाईलवर हसणे दोन तरुणांना चांगले महागात पडले आहे. एका तरुणाने दोन्ही तरुणांना चाकूने भोसकले आहे. त्यात दोन्हे तरुण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यत आले आहे.
मिळलेल्या माहितीनुसार रोहन आणि रुद्र या दोन तरुणांनी सूरजच्या फेसबुक प्रोफाईल फोटोवर हसले आणि कमेंट बॉक्समध्ये खिल्ली उडवली. याचा राग मनात धरून सूरज रोहन आणि रुद्र यांना बोलवले आणि त्यांना जाब विचाराला. तिघांमध्ये बाचाबाची झाली आणि तेव्हा सुरजने दोघांना चाकूने भोसकले आणि तिथून पळ काढला.
रोहन आणि रुद्र या हल्ल्यात गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर सूरजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.



























































