भरधाव वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे. अमरापूर-सुसरे रस्त्यावरील म्हसोबा वस्तीनजीक शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.

नामदेव बबन आठरे (वय 28), विजय मारुती मिसाळ (वय 22, दोघे रा. सुसरे, ता. पाथर्डी) अशी मृतांची नावे असून, आदेश शेषराव कंठळी (वय 21) हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघातानंतर या तिघांना उपचारासाठी शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच आठरे व मिसाळ यांचा मृत्यू झाला होता. मृत नामदेव आठरे या तरुणाला अवघ्या चार महिन्यांची एक मुलगी आहे. या अपघातानंतर संपूर्ण सुसरे गावावर शोककळा पसरली आहे.