या देशांमध्ये फाशीऐवजी ‘अशी’ देतात मृत्यूदंडाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या संपूर्ण देशात महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवण्याची मागणी होत आहे. 2012 साली घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी देशवासियांची मागणी आहे. हिंदुस्थानमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्यांना फाशी देण्यात येते. पण जगात असेही काही देश आहेत जिथे फाशीला परवानगी नसून त्याऐवजी मृत्यूदंडासाठी विविध पर्यायांचा वापर केला जात आहे.

जगभरात फक्त 53 असे देश आहेत जिथे एखाद्या गंभीर गुन्ह्यासाठी दोषी व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाते.  यात हिंदुस्थानचाही समावेश आहे. अॅमनेस्टी इंटरनॅशनलने दिलेल्या अहवालानुसार, जगातील 142 देशांनी मृत्यूदंडाची शिक्षाच रद्द केली आहे. या देशांमध्ये आरोपीने कितीही गंभीर गुन्हा केला तरी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात नाही.

hang-till-death_phansi_phas

 2015 साली – मडागास्कर, 2016 साली-बेनिन, 2017 साली- गिनीया आणि 2018 साली बुर्किना फासो या देशांनी मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली.

injection

तर 73 देशांमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्यांना गोळ्या घालून ठार करण्यात येते. तर काही देशांमध्ये विषारी इंजेक्शन देऊन दोषींला ठार केले जाते. यात 5 ते 9 मिनिटात व्यक्तीचा मृत्यू होतो. यासाठी फायरिंग स्कॉ्डला प्रशिक्षण दिले जाते.

police

पण हिंदुस्थानसह इतर 33 देशांमध्ये आजही दोषीला फासावर लटकवले जाते. तर सौदी अरेबियामध्ये दगड मारुन दोषीला गंभीर जखमी करुन ठार केले जाते. तर तीन देशांमध्ये भरचौकात दोषींचा शिरच्छेद केला जातो.