‘या’ महिलेने 87 तासात 208 देशांचा केला प्रवास, बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

एखादी व्यक्ती फक्त 3 दिवसात 208 देशांचा प्रवास करू शकते, असा विचार कधी तुम्ही केला आहे का? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. मात्र एका महिलेने हे करून दाखवलं आहे. या महिलेने फक्त 3 दिवसात 208 देशांचा प्रवास करून ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपलं नाव नोंदवलं आहे.

कोण आहे ही महिला?

डॉ.खावला अल रोमाथी असे या महिलेचे नाव आहे. त्या संयुक्त अरब अमिराती (‘यूएई’) येथील रहिवासी आहेत. त्यांनी केवळ 3 दिवसात 7 खंडांच्या 208 देशांचा प्रवास केला. त्यांनी हा प्रवास केवळ 3 दिवस, 14 तास, 46 मिनिटे, 48 सेकंदात पूर्ण केला.

डॉ रोमाथी यांनी 10 फेब्रुवारी 2020 रोजी युएईहून आपला प्रवास सुरू केला. 13 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे हा प्रवास थांबवला. यानंतर त्यांनी आपलं नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवलं. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यात आल्यानंतर त्यांनी त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या