दिवाळीनंतर कॉलेज सुरू नाही! उदय सामंत यांचे सुतोवाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाची राजधानी नवी दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातही काळजी घेण्याची गरज आहे. म्हणूनच दिवाळीनंतर महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. मात्र दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन याचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. त्यासंदर्भात राज्यातील पुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीनंतर सामंत यांनी पार पडलेल्या परीक्षांच्या निकालांची अंदाजे टक्केवारी यांची माहिती मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आम्ही कॉलेज सुरू करण्यासाठी कोणताही निर्णय घेतला नाही. अनेक वसतिगृहांत, कॉलेजमध्ये क्वारंटाइन सेंटर आहेत. यामुळे आम्हाला विचार करावा लागेल. विद्यार्थी, प्राध्यापकांना त्रास होणार नाही, असा आम्ही निर्णय घेऊ. मात्र आमच्याकडे काही कुलगुरूंनी परीक्षेप्रमाणेच ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.