
लॉकडाऊनविरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दुपारी पोवई नाका येथे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत त्यासमोरील आंब्याच्या झाडाखाली पोते टाकून थाळी ठेवून ‘भीक मांगो’ आंदोलनास प्रारंभ केला.
या आंदोलनामुळे साताऱयातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ‘भीक मांगो’ आंदोलन करीत जमा केलेले 450 रुपये घेऊन उदयनराजे यांनी चालत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. ती रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधीकडे जमा केली.



























































