उध्दव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर रत्नागिरीत जल्लोष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना शिवतीर्थावर महाविकासआघाडीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच रत्नागिरीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

शहरातील साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेसमोर महाविकासआघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एल.ई.डी स्क्रिन वर शपथविधीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. हा शपथविधी सोहळा मोठ्या स्क्रीनवर पहाण्यासाठी रत्नागिरीकरांनी गर्दी केली होती. शपथविधीनंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला. फटाक्यांची आतषबाजी करत लाडू वाटप करत आनंद सोहळा साजरा केला.यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदिप साळवी, उद्योजक रवींद्र सामंत,काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, शिवसेनेचे क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे,शहरप्रमुख बिपिन बंदरकर, राकेश चव्हाण, संजय साळवी, शिल्पा सुर्वे, मनिषा बामणे, प्रसाद सावंत सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.