
>> सचिन कावडे
चार वर्षांच्या कालखंडानंतर होणार्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्धार सभेच्या निमित्ताने हिंगोली शहरात भगवे चैतन्य संचारले आहे. सभेच्या निमित्ताने रामलीला मैदानावर हिंदुमहासागरच उसळणार आहे. सभेसाठी येणार्या शिवसैनिकांचा पावसापासून बचाव व्हावा म्हणून वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात येत असून, व्यासपीठही भव्यदिव्य असणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगोली येथे रविवार, २७ ऑगस्ट रोजी निर्धार सभा होणार आहे. रामलीला मैदानावर होणार्या या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पावसापासून बचावासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे. सभेचे मुख्य व्यासपीठही भव्यदिव्य असणार आहे. भाषणासाठी व्यासपीठापासून खास १६ फूट लांब रॅम्प उभारण्यात येत आहे. सभामंडपात ५० हजारांपेक्षा जास्त खुर्च्या लावण्यात येत असून, तेवढीच बैठक व्यवस्थाही असणार आहे.
शहर स्वागत कमानींनी सजले
चार वर्षांच्या कालखंडानंतर हिंगोलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन होत आहे. यानिमित्ताने शहरात भगवे चैतन्य अवतरले आहे. स्वागत कमानींनी सजले असून, चौकाचौकात सभेचे मोठमोठे होर्डिंग्ज झळकले आहेत. जाहीर सभेच्या नियोजनासाठी शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, नागेश पाटील आष्टीकर, सहसंपर्कप्रमुख गोपू पाटील, सुनील काळे, जिल्हाप्रमुख विनायक भिसे, संदेश देशमुख, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, अजित मगर, डॉ. रमेश शिंदे, गणाजी बेले, उद्धवराव गायकवाड, वसीम देशमुख, अॅड. रवि शिंदे, युवासेनेचे राज्य विस्तारक दिलीप घुगे, शिवा शिंदे, कन्हैया बाहेती, गणेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, डी.के. दुर्गे, जी.डी. मुळे, अनिल कदम, तालुकाप्रमुख भानुदास जाधव, आनंदराव जगताप, ज्ञानेश्वर झटे, संतोष देवकर, सखाराम उबाळे हे सभेची जय्यत तयारी करत आहेत.
21 तोफांची सलामी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन होताच २१ तोफांची सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे हे जनसमुदायास मार्गदर्शन करण्यासाठी रॅम्पवर गेल्यानंतरही फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.
पार्किंग या ठिकाणी करा
– पार्किंगची चार ठिकाणी व्यवस्था
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी हिंगोलीत येणार्यांसाठी शहरात चार ठिकाणी पार्विंâगची व्यवस्था करण्यात आली आहे.
– नांदेडकडून येणार्या वाहनांसाठी जिल्हा परिषदेचे जुने मैदान
– परभणीकडून येणार्या वाहनांसाठी एनटीसी परिसर
– वाशीमहून येणार्या वाहनांसाठी सिटी क्लब मैदान
– जवळा, पळशीकडून येणार्या वाहनांसाठी काबरानगर
खिचडी, पाण्याची व्यवस्था
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी मराठवाड्यासह राज्यभरातून येणार्या शिवसैनिकांसाठी स्वादिष्ट खिचडी आणि पाण्याची सोय करण्यात येणार आहे. खिचडी तसेच पाण्याच्या वाटपासाठी सभेकडे येणार्या रस्त्यांवर, सभाठिकाणही सोय करण्यात येणार आहे.




























































