
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसोबतचा संवाद दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथील शेतकरी बांधवांसोबत त्यांनी संवाद साधला. इथल्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या समस्या उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या. संकट कितीही गंभीर असलं तरी आपण खचायचं नाही, हा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बळीराजाला दिला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना आमदार जिल्हाप्रमुख कैलास पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.





























































