
मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील नांदर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.
































































