
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत काँग्रेस नेते शिवराज पाटील यांना श्रध्दांजली अर्पण केली. शिवराज पाटील यांनी पक्षाने ज्या-ज्या जबाबदाऱया दिल्या त्या निष्ठापूर्वक पार पाडल्या. मुंबईवर 26 नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते केंद्रात गृहमंत्री होते. त्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. अशी नैतिकता हल्लीच्या राजकारणात फार अभावाने आढळते. एखादी गोष्ट ज्याच्यात आपण अपयशी ठरलो किंवा त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देणे हे हल्लीच्या राजकारण्यांत दिसत नाही. ती हिंमत शिवराज पाटील यांनी दाखवली होती. जनतेचे संरक्षण करण्यात अपयश आले म्हणून त्यांनी आपले गृहमंत्रिपद सोडले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

























































