
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना मतदार याद्यांमधील गोंधळ व इंक घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी ”सत्तेची हवस असलेली अशी निर्लज्ज सरकार आजपर्यंत पाहिली नाही”, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
”या सत्ताधाऱ्यांवर सत्ता प्राप्त करण्याची प्रचंड हवस आहे. अशी निर्लज्ज सरकार आम्ही कधी पाहिली नाही. यासाठीच यांना वन नेशन वन इलेक्शन हवं आहे. एकदाच संपूर्ण देशात एकदाच घोटाळा करायचा आणि संपूर्ण देश ताब्यात घ्यायचा. त्यामुळे मी मतदारांना आवाहन करतो की जिथे तुमचं नाव असेल तिथे जाऊन मतदान करा”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी शाई पुसण्याच्या प्रकरांवर प्रतिक्रीया देताना, आता इंक घोटाळा झालाय का हे देखील बघावे लागेल, अशी प्रतिक्रीया दिली.






























































