
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती राज्यव्यापी दौऱ्याचा दुसरा टप्पा 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून रायगड आणि रत्नागिरी येथे भव्य पदाधिकारी मेळावा होणार आहे.
1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाड मतदारसंघातील शिवसैनिक व पदाधिकाऱयांचा मेळावा महाड पंचायत समिती कार्यालयनजीक भिलारे मैदानावर तर दुपारी 2 वाजता मावळ मतदारसंघाचा मेळावा कर्जत येथील पोलीस मैदानावर होईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.





























































