तेजस्वी युगाचा अंत झाला! उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. सुषमा स्वराज यांच्या निधनाने हिंदुस्थानी राजकारणातून एका तेजस्वी युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, सुषमाजींच्या जाण्याने केवळ देश आणि भारतीय जनता पक्षाचीच नव्हे, तर ठाकरे परिवाराचीही अपरिमित हानी झाली आहे. त्यांनी अनेकदा शिवसेना आणि भाजपमधील प्रेमाचा दुवा म्हणून काम केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुषमाजी यांच्या नात्यात एक आत्मीयता होती. बाळासाहेबांच्या जाण्यानंतरही हे नातं कायम राहिलं. त्यांच्या वागण्या-बोलण्यात आणि नेतृत्वात तेज होतं तसंच मांगल्यही होतं. मी संपूर्ण शिवसेना आणि ठाकरे परिवारातर्फे त्यांना श्रद्धासुमनं अर्पण करतो.