
मुंबईत प्रचाराचा रंग चढू लागला आहे. शिवसेनेने प्रचाराचा धडाका लावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शाखा आणि उमेदवारांच्या निवडणूक प्रचार कार्यालयांना भेटी देऊन शिवसैनिक आणि मतदारांशी संवाद साधत आहेत. सोमवारी उद्धव ठाकरे यांनी प्रभादेवी, वरळी, लालबाग, चिंचपोकळीत झंझावाती दौरा केला. यावेळी भगवे तुफानच सर्वत्र पाहायला मिळाले. तेजस ठाकरे, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, आमदार महेश सावंत, सुनील शिंदे, शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर यावेळी उपस्थित होते.
































































