पाच हजारांची लाच स्विकारणारा तलाठी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

1611
प्रातिनिधिक फोटो

उदगीर तालुक्यातील तलाठी प्रमोद माधवराव सूर्यवंशी यांनी फेरफार करून सातबाराला नोंद घेण्यासाठी 5 हजार रुपयाची लाच लातुरात स्विकारल्यानंतर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.

प्रमोद माधवराव सूर्यवंशी (तलाठी, सज्जा कुमठा व हेर ता. उदगीर) यांनी मौजे येथील तक्रारदार यांच्या शेतशिवारातील शेतीच्या वाटणीपत्राआधारे फेरफार करून सातबाराला नोंद करून घेण्यासाठी 5 हजार रुपयाची लाच मागितली होती. सदरील लाचेची रक्कम लातूर शहरातील विवेकानंद चौक येथील होंडा शोरुमच्या समोर 13 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजून 14 मिनिटांनी स्विकारली. त्याचवेळी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

दरम्यान, पोलीस उपअधिक्षक माणिक बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे हे करीत आहेत. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी पार पाडली.

आपली प्रतिक्रिया द्या