यूजीसी उगाच गोंधळ वाढवतेय; अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा

2519

देशात दिवसें- दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना परीक्षा घेण्यावरून यूजीसी उगाच गोंधळ वाढवण्याचे काम करत आहे. संकटकाळत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे चुकीचे असून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी भूमिका कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मांडली आहे.

कोरोनाच्या वातावरणात परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे आयआयटी, महाविद्यालये यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसीनेदेखील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून वर्षभरात ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या निकालानुसार विद्यार्थ्यांना पास करावे, अशी मागणी राहुल यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या