‘उजनी’ धरण 100 टक्के भरले, 16 दरवाजांतून विसर्ग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । टेंभूर्णी

सोलापूर जिल्ह्याचे वरदायिनी असलेले उजनी धरण सोमवारी दुपारी 100 टक्के भरले. धरणात सध्या 117 टीएमसी पाणीसाठा झाला असून, सोळा मोऱ्यातून पाच हजार क्युसेक वेगाने भीमा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असून, नीरा आणि भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच उद्योगधंदे, साखर कारखानदार आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुण्यातील 19 धरणांमधून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनीच्या जलाशयात येत आहे.