
ब्रिटनच्या बर्मिंमघममध्ये राहणारा मूळचा हिंदुस्थानी वंशाचा सुरजीत सिंहला आपल्या 76 वर्षीय आईची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा सुनावताना कोर्टाने म्हटले की, 15 वर्षांनंतर सुरजीतच्या पॅरोलवर विचार होईल, तोपर्यंत त्याला शिक्षा भोगावी लागेल. सप्टेंबर 2023 मध्ये टीव्ही रिमोटवरून वाद झाल्यानंतर सुरजीत सिंहने आईवर जीवघेणा हल्ला केला होता.