
युके मधील क्रेग हार्कर (35) यांनी द जॉर्ज पब आणि ग्रिल या आपल्या रेस्टॉरंटमध्ये काम करण्यासाठी नुकतीच एक नोकरभरतीची जाहिरात काढली. मात्र ही नोकरभरतीची जाहिरात सध्या चर्चेचा विषय बनली आहे. क्रेग यांनी आपल्या रेस्टॉरंटमध्ये काम करण्यासाठी शेफ, किचन पोर्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्या जागांसाठी नोकरभरती सुरु केली आहे. मात्र त्यांनी आपल्या जाहिरातीत खराब दात असणाऱ्या व तोंडातून आणि शरीरातून वास येणाऱ्या अर्जदारांना अर्ज करण्यास बंदी घातली आहे.
याबद्दल क्रेग सांगतात कि रेस्टोरंटचे संकेतस्थळ हे नेहमी आळशी अर्जदारांनी भरलेले असते. म्हणून मला आवश्यक वाटणाऱ्या अटींची मी जाहिरातीत यादी ठेवली आहे. क्रेग म्हणाले की मी लोकांना नोकरी देण्यासाठी तयार आहे. त्यांच्याकडे पूर्वीचा अनुभव नसला तरी चालेल. परंतु केवळ जॉब सेंटरने तुम्हाला सांगितले म्हणून अर्ज करू नका. तसेच आम्ही दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीबद्दल तुम्हाला काय वाटते? हे देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा.
क्रेग यांनी मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना सांगितले कि, तुम्ही मुलाखतीसाठी येण्यापूर्वी तुमचे अवगुण, वाईट सवई बाजूला सारा. तुमचे पहिले इम्प्रेशन हेच शेवटचे इम्प्रेशन असते त्यामुळे तुम्ही दात घासूनच मुलाखतीला यायला हवे. कोणत्याही मुलाखतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे पहिली छाप असते.
रेस्टॉरंट मध्ये येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी चांगले व्यक्तिमत्व असणे गरजेचे आहे. माझ्याकडे काम करणारे कर्मचारी अनोळखी लोकांशी गप्पा मारण्यात व मैत्री करण्यात चांगले असले पाहिजेत. ग्राहकांना मांस खाऊ घालण्यासाठी मला शाकाहारी उमेदवारांना नोकरीवर ठेवण्यास आवडेल असे क्रेग यांचे म्हणणे आहे.




























































