ब्रिटनकडून पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता, पंतप्रधान कीर स्टारमर यांच्याकडून घोषणा

ब्रिटनने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी यासंदर्भात घोषणा केली. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांनीदेखील पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली असून फ्रान्सदेखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

आतापर्यंत हिंदुस्थान आणि चीनसह जगातील 140 पेक्षा अधिक देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. भविष्यात पॅलेस्टाईन सरकारमध्ये हमास या दहशतवादी संघटनेची कोणतीही भूमिका नसेल, हमासने सर्व ओलिसांची सुटका करावी आणि इस्त्रायलनेही पॅलेस्टाईनवर लादलेले निर्बंध उठवावेत, असे कीर स्टारमर यांनी म्हटले आहे.