रशियात युक्रेनचा 8 ठिकाणी ड्रोन हल्ला; तीन वीज उपकेंद्रे आणि इंधन डेपो जळून खाक

युक्रेनच्या विशेष दलाने शनिवारी रात्री उशिरा रशियाच्या 8 भागांत लांब पल्ल्याच्या ड्रोनच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात रशियातील तीन वीज उपकेंद्रे आणि इंधन डेपो जळून खाक झाले. अमेरिकन मीडिया हाऊसने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. रशियाच्या संरक्षण यंत्रणेने युक्रेनचे सुमारे 50 ड्रोन पाडल्याचे म्हटले आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू करून तेथील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. युक्रेनमध्ये भयंकर दुष्काळ असून आता तापमानात सातत्याने घसरण होत आहे. किमान तापमान उणे नोंदवले गेले. याचाच फायदा घेत रशियन सैन्य युक्रेनवर हल्ला करत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लष्कराशी संबंधित उद्योगांना ऊर्जा पुरवणारी रशियाची ऊर्जा केंद्रे हल्ल्याचे लक्ष्य होते. युक्रेनच्या सुरक्षा सेवा, संरक्षण गुप्तर विभाग आणि विशेष दलांनी संयुक्तपणे हल्ला केला होता. हा हल्ला युक्रेनच्या सुरक्षा सेवा, संरक्षण गुप्तचर आणि विशेष दलांनी संयुक्तपणे केला होता. युक्रेनच्या हल्ल्यानंतर अनेक भागात वीज आणि पाणीपुरवठा ठप्प झाल्याने येथे भयंकर स्थिती आहे.

 

रशियाचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न

गेल्या काही महिन्यांत युक्रेनने रशियन तेल शुद्धीकरण कारखाने, टर्मिनल्स आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले चढवले आहेत. एका वृत्तवाहिनीने सांगितल्यानुसार रशियाला आर्थिकदृष्टय़ा कमकुवत करण्यासाठी युक्रेनने हल्ल्यांचे हत्यार उपसल्याची माहिती आहे.

अमेरिकन काँग्रेसने युक्रेनच्या आर्थिक मदतीसाठी विधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर युक्रेनला अमेरिकेकडून सुमारे 5 लाख कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. यातील 1 लाख 91 हजार कोटी रुपये अमेरिकन शस्त्रास्त्रs आणि सुविधा पुरवण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.

अमेरिकन लष्करी कारवायांसाठी 91 हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. युक्रेनला प्रगत तंत्रज्ञानासह शस्त्रs खरेदी करण्यासाठी सुमारे 1 लाख 16 हजार कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. विविध प्रकारची महत्वाची शस्त्र्ाास्त्र्ाs खरेदी करण्यासाठी मदत दिली जाणार आहे