उल्हासनगरमध्ये 20 मार्च पासून तीन दिवस दुकाने बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महाराष्ट्रात पाय पसरू लागला आहे. त्याला वेळीच रोखण्यासाठी काही कठोर पण आवश्यक निर्णय घेण्याचा दृष्टीने सरकार पाऊल टाकत आहे. उल्हासनगर महानगरपालिकेनेही गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला, दूध, औषधे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. 20 मार्चपासून पुढील 3 दिवस दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

img-20200319-wa0023