नौदलाची कमाल; निर्जंतुकीकरणासाठी वापरणार खास टेक्नॉलॉजी, मुंबईत पहिला प्रयोग

1317

देशातील अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने आपल्या देशातील अंशतः आणि शेवटी पूर्ण लॉकडाऊन उठवण्यात येईल, त्याआधीच “नवीन दैनंदिन” जीवन कसे असेल याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषत: डॉकयार्ड्स आणि नौदल जिथे लॉकडाऊन उठल्यानंतर मोठ्या संख्येने कामगार पुन्हा कामावर रुजू होतील आणि ही संख्या हळूहळू वाढत जाईल. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. यामुळे कामगारांचे कव्हरऑल, उपकरणे, वैयक्तिक साधने (गॅझेट्स) आणि मास्क यांच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

या गरजा पूर्ण करण्यासाठी नौदल डॉकयार्डकडून (मुंबई) एक अतिनील स्वच्छता खोली (UV sanitisation bay) तयार केली आहे. या अतिनील उपकरणाचा उपयोग कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी साधने, कपडे आणि इतर विविध वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी केला जाईल. अतिनील-सी (UV-C) प्रकाशयोजनेसाठी एल्युमिनियम शीट्सच्या विद्युतीय व्यवस्थेच्या बनावटीद्वारे एका मोठ्या सामान्य खोलीचे ‘अल्ट्राव्हायोलेट बे’ मध्ये रूपांतर करणे हे एक मोठे आव्हानात्मक काम होते.

याद्वारे ज्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करायचे आहे त्यांतील अतिनील-किरणोत्सर्गासाठी अल्ट्राव्हायोलेट-सी प्रकाश स्रोत वापरते. नामांकित संशोधन संस्थाच्या अभ्यासानुसार अल्ट्राव्हायोलेट-सी चा परिणाम सार्स (एसएआरएस), इन्फ्लूएंझा इत्यादी श्वासाशी निगडित विषाणूंवर परिणामकारक रित्या सिद्ध झाला आहे. असे निदर्शनास आले आहे की सूक्ष्मजीव जंतू जेव्हा 1 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी 1 जी / सेमी 2 तीव्रतेच्या अतिनील-सीच्या संपर्कात येतात तेव्हा ते फारशी हानी पोहोचवू शकत नाही, हे एक प्रभावी निर्जंतुकीकरण असल्याचे निदर्शनास आले आहे.

नौदल स्थानक (कारंजा) येथे देखील अशीच सुविधा स्थापित करण्यात आली आहे, जेथे अतिनील-सी स्टरलाइझर व्यतिरिक्त, एक औद्योगिक ओव्हन देखील ठेवण्यात आला आहे, जो कमीतकमी 60 अंश सेल्सिअस तापमानात गरम होते, बहुतांश सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यासाठीचे हे एक योग्य तापमान आहे.

ही सुविधा प्रवेशद्वारा जवळच ठेवण्यात आली असल्याने त्याचा सहज आणि प्रभावी वापर शक्य होईल. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी कोविड-19 चा प्रसार कमी करण्यास मदत होईल.

आपली प्रतिक्रिया द्या