
दिल्ली दंगलीतील कथित कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला जेएनयूतील माजी विद्यार्थी नेता उमर खालीद याला दिल्ली न्यायालयाने दिलासा दिला आहे. बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी त्याला 15 दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2020मध्ये दिल्ली दंगली प्रकरणी खालीदला यूएपीए अंतर्गत अटक करण्यात आली होती.


























































