पाकिस्तान दहशतवादाचे ‘विद्यापीठ’; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातील निष्कर्ष

783
प्रातिनिधीक फोटो

पाकिस्तानातून अफगाणीस्तानात हजारोच्या संख्येत दहशतवादी पाठवण्यात आले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच या अहवालात पाकिस्तान दहशतवाद्यांचे विद्यापीठ असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना प्रोत्साहन, आर्थिक मदत आणि आश्रय देण्यात येतो. मात्र, जगभरातून होणाऱ्या या आरोपांचा पाकिस्तानने नेहमी इन्कार केला आहे. आता संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातूनच पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आणि दहशतवाद पोसणारे असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

पाकिस्तानच्या भूमीचा वापार दहशतवाद्यांना करू देणार नसल्याचे पाकिस्तानकडून छातीठोकपणे सांगण्यात येते. मात्र, त्यांचे हे वक्तव्यही नेहमीप्रमाणेच फोल ठरले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने सादर केलेल्या अहवालात पाकिस्तानमधून अफगाणीस्तानात मोठ्या संख्येने दहशतवादी पाठवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानत काही दहशतवादी असल्याची कबूली काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीच जाहीरपणे दिली होती. पाकिस्तानात सुमारे 30 ते 40 हजार दहशतवादी असल्याचे त्यांनी म्हटले होते.

जगभरात सर्वांनाच माहित आहे की, पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र बनले आहे. अफगाणीस्तानातील सक्रीय परदेशी दहशतवाद्यांमध्ये 6500 पाकिस्तानी नागरिक असल्याचे अहवलात म्हटले आहे. जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबा दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना अफगाणीस्तानात कारवायांसाठी पाठवतात, असे अहवालात नमूद केले आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानच्या या करवायांबाबत आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याबाबत, तसेच त्यांच्या दहशतवादी प्रशिक्षण शिबीरांबाबत पुराव्यांसह माहिती जगाला प्रत्येकवेळी दिली आहे. तसेच पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाच्या संकटाकडेही जगाचे अनेकदा लक्ष वेधले होते. आता सुरक्षा परिषदेच्या अहवालातच पाकिस्तान दहशतवादाचे विद्यापीठ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या