Under 19 WC – अवघ्या 4.5 षटकांमध्ये जिंकला टीम इंडियाने सामना

1086

दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या अंडर-19 विश्वचषकामध्ये टीम इंडियाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. प्रियाम गर्गच्या नेतृत्वाखाली खेलताना टीम इंडियाने जपानचा 10 विकेट्सने दणदणीत पराभव केला. आठ षटकांच्या गोलंदाजीता पाच धावा देऊन चार गडी बाद करणाऱ्या रवी बिश्नोईला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

जपानने दिलेल्या 42 धावांचे लक्ष्य टीम इंडियाने अवघ्या 4.5 षटकांमध्ये पार केले. सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने नाबाद चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 29 आणि कुमार कुशाग्रने दोन चौकारांच्या सहाय्याने नाबाद 13 धावा केल्या.

41 धावांमध्ये खुर्दा
पहिल्यांदाच अंडर-19 विश्वचषकामध्ये खेळणाऱ्या जपानला चार वेळच्या विजेत्या टीम इंडियाने अवघ्या 41 धावांमध्ये गारद केले. कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोई या दोघांनी जपानच्या खेळाडूंना मैदानावर टिकू दिले नाही. बिश्नोईच्या फिरकीपुढे जपानी खेळाडूंनी शरणागती पत्करली. त्यानेच पाच फलंदाज तर शून्यावर बाद झाले. बिश्नोईने चार, कार्तिक त्यागीने तीन आणि आकाश सिंहने दोन बळी घेतले.

न्यूझीलंडशी सामना
फॉर्मात असणाऱ्या टीम इंडियाने पहिल्या लढतीत श्रीलंकेचा 90 धावांनी पराभव केला होता. या लढतीत यशस्वी जयस्वालने 59, कर्णधार प्रियाम गर्गने 56 आणि ध्रुव जुरेलने 52 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या लढतीत टीम इंडियाने जपानचा पराभव केला. आता टीम इंडियाचा तिसरा सामना न्यूझीलंडशी 24 जानेवारीला होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या