मुंबईत 40 ठिकाणी भूमिगत कचरापेट्या; अस्वच्छता, दुर्गंधी टाळण्यासाठी निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पसरणारी अस्वच्छता-दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे पालिकेने मुंबईभरात 40 ठिकाणी भूमिगत कचरापेटय़ा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांत कचरापेटय़ा बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायट्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱया इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱ्याच्या किल्हेकाटीचे क्यकस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण मुंबई दोन ठिकाणी आणि मालाड, कांदिवलीत प्रत्येकी एका ठिकाणी भूमिगत कचरापेटय़ा बसविण्यात आल्या आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे मुंबईच्या विविध भागांत 40 ठिकाणी भूमिगत कचरापेटय़ा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कचरा रोखण्यासाठी रेल्वे रुळांच्या शेजारी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

असा राबवणार उपक्रम
पालिकेच्या 20 विभागांत 40 ठिकाणी या भूमिगत कचरापेटय़ा बसविण्यात येतील. मॅक इन्व्हायरोटिक ऍण्ड सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून या कचरापेटय़ा बसविण्याचे काम केले जाईल.
2.2 घनमीटर क्षमतेचे कचरा डबे असतील. या कचऱयाच्या डब्यात जमा होणारा कचरा पालिकेच्या कचरा वाहक गाडय़ांच्या माध्यमातून वेळोवेळी उचलला जाईल.
या कचरापेटय़ांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा राहण्याची व्यवस्था असेल. सुक्या कचऱयाच्या पुनर्वापरासाठी पालिका लवकरच कंत्राटदाराच्या माध्यमातून यंत्रणा सुरू करणार आहे.