अवकाळी पावसाने पिकांना फारसा फटका नाही! केंद्रीय कृषिमंत्री बरळले

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गहू, हरभरा या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. कांदा, भाजीपाला, द्राक्ष, फळबागा उद्ध्वस्त झाल्या. यामुळे देशातील अनेक भागातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. महाराष्ट्रात भयाण परिस्थिती असताना पेंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बळीराजाच्या जखमेवर मिठ चोळले आहे. अवकाळी पावसाने पिकांवर फार परिणाम झाला नाही, फारसा फटका बसलेला नाही, असे तोमर बरळले.

नुकसानीबाबत राज्य सरकारांनी अद्याप आपला अहवाल पेंद्राकडे पाठवलेला नाही. नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आधी राज्यांनी आपल्या आपत्ती निवारण निधीतून मदत करावी. नुकसानीचा अहवाल मिळाल्यानंतर पेंद्र सरकार मदत करेल, असे कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले.