टेलिकॉम स्पेक्ट्रमचा लिलाव, केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली 2,215 मेगाहर्टझ्  स्पेक्ट्रमच्या विक्रीस मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ravi-shankar-prasad-pc

केंद्र सरकारने सुमारे 4 वर्षांनंतर दूरसंचार आणि दळणवळण स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत टेलिकॉम स्पेक्ट्रम विक्रीचा निर्णय घेण्यात आला. केंद्राने 2,251 मेगाहर्टझचे स्पेक्ट्रम विक्रीला काढल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. या लिलावासाठीच्या अटी 2016 प्रमाणेच असतील असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने यंदाच्या आर्थिक वर्षअखेरीपर्यंत 700, 800, 900, 1800, 2100, 2300 आणि 2500 मेगाहर्टझचे स्पेक्ट्रम लिलावात विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावातून केंद्राला 1.33 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.