केंद्रीयमंत्री अर्जुन मुंडा कोरोना पॉझिटिव्ह

देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांचा या राज्यात दौरे होत आहेत. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडाही आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेले होते. त्या राज्यातून दिल्लीला परतल्यावर त्यांना असव्सथ वाटू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंडा यांनी ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आपण पश्चिम बंगाल आणि आसमच्या निवडणुकीच्या कामात गुंतलो होतो. पश्चिम बंगालमधून आपण मंगळवारीच परतलो आहोत. अस्वस्थता वाटत असल्याने आपण आपली कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी आणि काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

देशभरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात 1.15 लाख नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या तीन दिवसात दुसऱ्यांदा कोरोनाबाधितांची संख्या एक लाखावर गेली आहे. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 8 लाखांपर्यंत पोहचली आहे. आता केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या