
सामना प्रतिनिधी । पुणे
काहीच उद्योग राहिला नसल्याने राज ठाकरे हे सध्या देशभरातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत फिरत आहेत. त्यांच्या ईव्हीएमविरोधात आंदोलनाचा काहीच फरक पडणार नाही अशी बोचरी टीका रिपाइं नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
ईव्हीएमच्या मुद्दय़ावर निरर्थपणे देशभरातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत फिरण्यापेक्षा राज्यात मनसे कशी वाढेल याकडे राज ठाकरे यांनी अधिक लक्ष द्यावे असा सल्ला आठवले यांनी दिला. ईव्हीएम मशीन मोदींनी नाही तर काँग्रेसने आणले. त्यामुळे ईव्हीएमबाबत बोलण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही, असे ते म्हणाले.




























































