कोरोनामुक्त झाल्यानंतर नवजन्म झाल्यासारखे वाटतेय, डिस्चार्जनंतर केंद्रीय मंत्री नाईक यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविडची लागण झाल्यानंतर उपचारासाठी 14 ऑगस्ट रोजी मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना आज हॉस्पिटल लमधून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटल मधून निघाल्या नंतर साई बाबांचे दर्शन घेऊन नाईक घरी परतले. तेथे त्याचे ओवाळणी करून स्वागत करण्यात आले.

कोविडमधून बरे झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना नाईक म्हणाले, कोरोनामुक्त झाल्याने नवीन जन्म झाला असेच वाटत आहे. आता आपण अतिशय सकारात्मक बदल झालेली व्यक्ती देखील बनलो आहे, असेही ते म्हणाले. 14 ऑगस्ट रोजी मला गोव्यात मणिपाल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आणि तेव्हापासून मी बरेच चढउतार पाहिले, असे सांगून नाईक म्हणाले, माझ्या आयुष्याच्या या टप्प्यात मी या देशातील वैद्यकीय कर्मचारी कोविडशी लढण्यासाठी केलेल्या अलौकिक प्रयत्नांचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. या सर्व कोविड हिरोना माझा सलाम.

नाईक म्हणाले, आपल्या उपकारकर्त्यांची नावे सांगताना नेहमीच काही महत्त्वाची नावे अजाणीवपूर्वक विसरण्याची जोखीम असते पण तरीही काही जणांचे नावं माझ्या  कृतज्ञतेचे नोंदवहीत  ठेवावे लागते. उपचार करणाऱ्या युनिटचे प्रमुख  मनीष त्रिवेदी यांचे विशेष कौतुक असून  ज्यांनी आवश्यक ते प्रत्येक संसाधन उपलब्ध असल्याचे सुनिश्चित केले. मणिपाल टीमचे कोविड केअर इंटरनेस्टिस्ट्सचे डॉ.  मिलिंद नाईक, अमोल महालदार (इंटरेसिस्ट्स) डॉ. गौरेश पलाव, डॉ. मीशा सेठी आणि डॉ. इलेन रॉड्रिग्स आणि माझे पलोमोनोलॉजिस्ट डॉ. प्रसाद प्रभु यांचे आभार मानत नाईक म्हणाले, रीवा बार्नेटो, जिनो पाउलोस आणि नम्रता नाईक यांच्या नेतृत्वाखालील नर्सिंग चमू तसेच इतर परिचारिका, ज्यांनी मला बरे होण्यास मदत केली, त्यांच्या बद्दल नेहमीच कृतज्ञ राहणार आहे.