
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख ‘दुर्घटना’ (अपघात) असा केल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते दिंग्विजय सिंह यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या ही दहशतवादी घटना होती की अपघात, असा खरमरीत सवाल केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी देखील विचारला आहे.
#WATCH Union minister VK Singh on Congress leader Digvijaya Singh terming #Pulwama terrorist attack an “accident”,says, “With due respect, I would like to ask Digvijaya Singh Ji, was Rajiv Gandhi’s assassination an accident or a terror incident?” pic.twitter.com/Sm1blc2Gjj
— ANI (@ANI) March 5, 2019
पुलवामा येथे CRPF च्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या राजकारणाने गलिच्छ पातळी गाठली आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी हा हल्ला ‘अपघात’ होता असे ट्वीटमध्ये म्हटले आहे. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
किन्तु पुलवामा दुर्घटना के बाद हमारी वायु सेना द्वारा की गयी “Air Strike” के बाद कुछ विदेशी मीडिया में संदेह पैदा किया जा रहा है जिससे हमारी भारत सरकार की विश्वसनीयता पर भी प्रश्न चिन्ह लग रहा है।
— digvijaya singh (@digvijaya_28) March 5, 2019





























































