
हर्षित बन्सल या 25 वर्षीय ज्वेलर्सने तब्बल 12 हजार 638 छोटय़ा हिऱ्यांपासून खास अंगठी तयार केली आहे. हर्षितच्या या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे. मॅरिगोल्ड असे या हिरेजडीत अंगठीला नाव देण्यात आले असून त्याचे वजन सुमारे 165 ग्रॅम आहे.
अनोखी अंगठी म्हणजे हर्षित बन्सलचे डिम प्रोजेक्ट आहे. दोन वर्षांपूर्वी सूरत येथे ज्वेलरी डिझाईनचा कोर्स पूर्ण केल्यानंतर हर्षितला अनोखी अंगठी साकारण्याची कल्पना सुचली. हर्षित सांगतो, मी या अंगठीत 10 हजारांपेक्षा अधिक हिरे लावण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. मी यासाठी अनेक डिझाईन तयार केल्या. परंतु ते कामी आले नाही.
सध्या तरी या अंगठीला विकण्याचा कोणताही विचार हर्षितच्या मनात नाही. हर्षित सांगतो, हे प्रोजेक्ट माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे. माझ्यासाठी ही अनमोल वस्तू आहे. याआधी ज्या अंगठीत सर्वात जास्त हिरे लावण्याचा रेकाॅर्ड झाला होता. तीदेखील एका हिंदुस्थानींनी तयार केली होती. त्यामध्ये सात हजार 801 हिरे होते.

























































