
सामना ऑनलाईन । औसा
औसा शिवारातील शहरातील सर्वे क्रं 138 मधील गुरपदअप्पा शरणाप्पा सगरे यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. सदर व्यक्तीचे वय ५५ ते ६० वर्ष असल्याचा अंदाज आहे.
औसा शहरापासून 3 कि.मी. अंतरावर असलेल्या सगरे यांच्या शेतात पुरुष जातीचे अनोळखी प्रेत सडलेल्या अवस्थेत आढळले असल्याने खळबळ उडाली आहे. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरु असून सदरील शेतकरीही आपल्या शेतातील सोयाबीनचे गुत्ते देण्यासाठी शेतात गेला असता सदर परिसरात दुर्गंध येत होता. जवळ जाऊन पाहिले असता सडलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह त्यांच्या निदर्शनास आला. सगरे यांनी याची खबर औसा पोलिसांना दिली असता औसा पोलिसांनी पंचनामा केला. सदरील इसम हा आठ ते दहा दिवसापुर्वी मृत झाला असल्याचे सांगितले जात आहे . ग्रामीण रुग्णालय औसा येथे सदरील इसमाचे शवविच्छेदन करण्यात आले पुढील असून तपास सुरू आहे.


































































