
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
ऑक्टोबर तालुक्यातील करंजी घाटात रविवारी दुपारी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला आहे. दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील आडगाव येथील एका शेतकऱ्याची हत्या करून त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याची घटना घडली होती. त्या पाठोपाठ आज दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि रविवारी दुपारी करंजी घाटात असलेल्या दरीत एक मृतदेह असल्याची खबर पठारी पोलीस स्थानकाला एका खबऱ्याने दिली. माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पोलीस गेले असता साधारणतः ४० वयाच्या एका तरुणाचा मृतदेह त्यांना करंजी घाटात जाणाऱ्या दरीच्या तोंडाला आढळून आला. या तरुणाच्या खिशात काहीही आढळून आलेले नसून पायावर काठीने मारहाण करण्याचे व्रण आढळले. तर या तरुणाच्या तोंडावर व अंगावर खरचटल्याच्या खुणा आहेत. या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील आडगाव येथील एका शेतकऱ्याचे अपहरणकरून त्याचा खून करण्यात आला होता व त्याचा मृतदेह धारवाडी लोहसर मार्गाच्या कडेला टाकून देण्यात आला होता.



























































