दादरची दीक्षा चमकली मामि फेस्टिवलमध्ये; अनसेड लघुपटाने मनं जिंकली

581

सध्या मुंबईत मामि फिल्म फेस्टिवलची धूम सुरू आहे. गुरुवारपासून फेस्टिवलला दणक्यात सुरुवात झाली आहे. देशविदेशातील सिनेमा आणि लघुपटांचा हा महोत्सव 24 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. आज फेस्टिवलमध्ये शिवाजी पार्क, दादर येथे राहणाऱ्या दीक्षा म्हसकर या मराठमोळ्या युवतीच्या ‘अनसेड’ या लघुपटाचे क्रिनिंग झाले. दीक्षाच्या पाच मिनिटांच्या लघुपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

मुंबई शहरात येऊन पैसे कमवायचे, जीवनात स्थिर व्हायचे हे अनेकांचे स्वप> असते. मात्र प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होईलच असे नाहीत.  परिस्थितीमुळे अनेकांना स्वतःच्या तत्वाला मुरड घालून चुकीच्या मार्गाने चालावे लागते. अशीच दोन अनोळखी माणसं मुंबईच्या गर्दीत एकमेंकांसमोर येतात. त्यातील एक खिसेकापू असतो. चोरलेल्या पाकिटात त्याला एक पत्र मिळतं. डोळ्यांत स्वप्न घेऊन शहरात जाणाऱ्या एका मुलाला पित्याने लिहिलेले ते पत्र असते. ते वाचून त्या चोऱ्याची काय मनोवस्था होते, ते या पाच मिनिटांच्या लघुपटातून बघावयास मिळते. मामि फेस्टिवलमध्ये डायमेंशन मुंबई या विभागात दीक्षाच्या ‘अनसेड’ सह 12 लघुपटांचा समावेश होता.

दीक्षाने मास मीडिया अँड कम्युनिकेशचे शिक्षण पूर्ण झाल्यावर  ऍडर्व्हटायझिंगमध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे. त्यानंतर व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल या संस्थेतून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले. ‘अनसेड’ या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन दीक्षाने केले आहे.

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात लोकलने प्रवास करताना वेगवेगळी माणसं दिसतात. त्यांचे निरीक्षण जेव्हापासून करायला लागले, तेव्हाच ‘अनसेड’ची संकल्पना सुचली. कुटुंबापासून दूर राहून या मायानगरीत स्वतŠचं नशीब घडवणे तितके सोपे नाही. लोक इथे येतात, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणताही धोका पत्करतात. हे ‘अनसेड’मध्ये दाखवले आहे. लघुपटात जिवंतपणा यावा, कुठेही कृत्रिमपणा भासू नये, म्हणून त्या त्या ठिकाणी जावून, अगदी गनिमी काव्याने चित्रीकरण केले. खूप मजा आली. मुंबईचे कधीही न संपणारं स्पिरिट जवळून अनुभवले.

– दीक्षा म्हसकर

आपली प्रतिक्रिया द्या