उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा, 50-60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता

फोटो - रुपेश जाधव

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच या भागात 50-60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, ताशी 50-60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.


तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40-50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 30-40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.