निष्क्रिय जीमेल अकाऊंट बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई – दोन वर्षांहून अधिक काळ निष्क्रिय असलेली जीमेल खाती गुगल बंद करणार आहे. डिसेंबरपासून ही जीमेल खाती हटवली जाणार आहेत.

युजर्सना स्पॅम, फिशिंग आणि खाते हायजॅकिंगसारख्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या खात्यांचा बराच काळ वापर केला गेला नाही त्यांच्याशी तडजोड होण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगार या खात्यांचा वापर चुकीच्या कामांसाठी करू शकतात, असे कंपनीचे म्हणणे आहे.

जीमेल खाती हटवल्यामुळे वापरकर्ते मेल, गुगल ड्राइव्ह, दस्तऐवज, गुगल पह्टोसह त्या खात्याशी संबंधित सेवा वापरू शकणार नाहीत.