उत्तर प्रदेशातील 15 जिल्ह्यात लॉकडाऊन, मुख्यमंत्री योगींची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभुमीवर उत्तर प्रदेशच्या 15 जिल्ह्यांत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आधी महाराष्ट्र आणि दिल्लीतही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशच्या आग्रा, लखनौ, गौतमबुद्धनगर, गाजियाबाद, मुरादाबाद, वाराणसी, लखीमपुर खीरी, बरेली, आजमगढ़, कानपुर, मेरठ, प्रयागराज, अलीगढ़, गोरखपुर आणि सहारनपुर या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 31 मार्च पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे तसेच या लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला सर्व नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता राज्यांनी लॉकडाऊची घोषणा केली. सर्वात आधी पंजाबने नंतर महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेह्स, दिल्ली राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. आता उत्तर प्रदेशमध्ये 15 जिल्ह्यांत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.